विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील – विनोद तावडे

file photo

मुंबई : शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात येत असून राज्यात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे व त्यापुढेही गतीने करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.शिक्षण क्षेत्रासंबंधी विविध प्रश्नांच्या अनुषंगाने नियम २६० अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना तावडे बोलत होते.

तावडे म्हणाले, मुलांचा अभ्यासक्रम निवडताना त्यांना कुठल्या विषयात किती गुण मिळाले यापेक्षा त्यांचा कोणत्या विषयाकडे कल आहे, त्यानुसार शाखा निवडणे व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी कलमापन चाचणी सुरु केली. दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊन त्यांचे वर्ष वाचविले. यामुळे कित्येक मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली.

अभ्यासक्रमाच्या बदलाच्या अनुषंगाने विद्या प्राधिकरणाच्या एका छताखाली सर्वांना एकत्र आणून पाठ्यपुस्तक तयार करण्याचे काम केले. ज्या शाळेत पट संख्या १० पेक्षा कमी आहे अशा शाळांचे समायोजन करून मुलांना अधिक चांगले शिक्षण मिळण्यासाठी दुसऱ्या शाळेत समाविष्ट केले. कमी दृष्टी असलेल्या मुलांसाठी मोठ्या अक्षरांची पाठ्यपुस्तके दिली.शिष्यवृत्तीसाठी वेगळी परीक्षा घेतली.व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाचे वेगवेगळे प्रयोग सध्या सुरु आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)