विद्यार्थ्यांना गाई संवर्धनाबाबत मार्गदर्शन

चिखली – येथील चंद्रभागा गोशाळेतर्फे विद्यार्थ्यांना गाईच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चिखली परिसरातील विविध तीन शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

गो पालनाचे महत्त्व, गाईंच्या विविध जाती, त्याचे उपयोग याविषयी माहिती देण्यात आली. तसेच आरोग्याच्या दृष्टीने देशी गाईच्या दुधाचे फायदे समजावून सांगण्यात आले. देशी गाईचे दूध शरीरास कसे फायदेशीर आहे, शरीराच्या वाढीस दूध नेमके कोणते महत्त्वपूर्ण कार्य करते, गाईच्या दुधातील व म्हशीच्या दुधातील घटकात कोणता फरक आहे. याबाबत माहिती देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण लांडगे, सचिव आनंदा गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)