विद्यार्थ्यांना कृतीशील बनवण्याची जबाबदारी शिक्षक व पालकांची – पी. एस. मुखर्जी

निगडी – विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत झाला, तर तो जीवनात सक्षम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून मिळणाऱ्या ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्ये आत्मसात करावीत. गतीने पुढे जाण्यासाठी सतत अभ्यास करणे आवश्‍यक आहे. अभ्यासच केला नाही तर मुले पुढे जातील कशी? त्यासाठी मुलांना कृतीशील बनवण्याची जबाबदारी शिक्षक व पालकांची आहे, असे प्रतिपादन जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे सचिव पी. एस. मुखर्जी यांनी केले.

येथील रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विद्या मंदिराच्या वार्षिक स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन सुभाष चौधरी होते. हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी अविनाश खैरे, कार्याध्यक्ष शांताराम भालेकर, अध्यक्ष धनाजी भालेकर, उपाध्यक्ष पंढरीनाथ जांभळकर, समन्वय समिती अध्यक्ष सुधाकर दळवी, सचिव भागवत चौधरी, खजिनदार दशरथ जगताप, प्राचार्य व पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भसे, मुख्याध्यापक शिवशरण सालोटगी उपस्थित होते.

यावेळी माजी विद्यार्थी अविनाश खेरे शाळेचे ऋण व्यक्‍त करताना म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांची शिक्षक जी तयारी करून घेतात, ते अविस्मरणीय आहे. जो विद्यार्थी शिक्षकांचे मनापासून ऐकेल, मार्गदर्शन घेईल तो आपल्या सर्व क्षेत्रात यशस्वी होऊन प्रगती पथावर पोहचेल. शिक्षकांच्या ऋणाची परतफेड कधीच होऊ शकत नाही. या कार्यक्रमात निसर्ग संवर्धन, पर्यावरण, अंध्दश्रध्दा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, बेटी बचाव, लोकगीते, लावणी, बालगीते, शेतकरी, आदिवासी, कोळी गीत, महाराष्ट्रातील दैवते यावर गाणी व नृत्य सादर केले.

मुख्याध्यापक शिवशरण सालोटगी यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा सांगून गरीब मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी झटलेल्या कै. शंकरराव देशमुख, कै. बाजीराव गारगोटे, कै. मनोहर वाढोकार, कै.दयाराम नेरकर यांचे स्मरण केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बालवाडी विभागाचे चेअरमन रमेश भालेकर होते. गणेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रूपा चव्हाण यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)