विद्यार्थ्यांना कृतीयुक्‍त अध्ययन हवे

तळेगाव दाभाडे : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे येथे संस्थेतील कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते संतोष तोत्रे यांचा सत्कार करताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे, महेशभाई शहा, सोनबा गोपाळे व इतर.
  • शिक्षकांच्या कार्यशाळेत संतोष खांडगे यांचे मत

पवनानगर (वार्ताहर) – पाठ्यपुस्तकांबरोबरच अद्यावयात तंत्रज्ञानाचा गरजेनुसार व योग्यप्रमाणात वापर करून विद्यार्थ्यांना कृतीयुक्‍त अध्ययनास प्रेरीत करावे, असे मत संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्‍त केले.
तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची दोन दिवसांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्‌घाटन संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले.

या वेळी संतोष खांडगे बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

-Ads-

संतोष खांडगे म्हणाले की, “जलद, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या शासनाच्या धोरणपूर्तीसाठी मराठी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून तंत्रज्ञानाचा वापर करून कृतीयुक्‍त अध्यापन केले पाहिजे. त्यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या सर्व शाळा डिजीटल व आयएसओ मानंकन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोदय त्यांनी व्यक्‍त केला. संस्थेचे संस्थापक लोकमान्य टिळक व संस्थापक सचिव आण्साहेब विजापूरकर यांच्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी संदीप गुंड व धनराज कदम पाटील हे प्रमुख वक्‍ते म्हणून उपस्थित होते.

या वेळी संदीप गुंड यांनी आजच्या शिक्षणातील तंत्रज्ञानाचे महत्व तसेच शाळा डिजीटल केल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक यांनी होणारा तंत्रज्ञानाचा फायदा यावर व्याख्यान दिले. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख व्याख्याते म्हणून संतोष तोत्रे हे उपस्थित होते. त्यांनी बदलते शैक्षणिक धोरण यासंदर्भात “शिक्षकांची आजची कर्तव्य’ या विषयावर व्याख्यान दिले. राष्ट्रला घडविणारी संघटना आहे, तसेच ग्रंथाचे केवळ पारायण न करता पारायण म्हणजे आचरण सर्वांनी केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पांडुरंग पोटे यांनी केले. सूत्रसंचालन संजय खराडे व रूपेश शिंदे यांनी केले. संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रगती विद्या मंदिर (इंदोरी) शाळेने केले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)