विद्यार्थ्यांना किमान एक कलाविषय शिकवायला हवा – डॉ. जब्बार पटेल

कोल्हापूर – कलात्मक विषयांच्या बाबतीत जाणीव निर्मिती होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून किमान एक तरी कलाविषय शिकवायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार डॉ. पटेल यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १ लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पटेल बोलत होते.

यावेळी बोलताना  डॉ. जब्बार पटेल म्हणाले, आपल्या समाजात कलात्मक विषय तुलनेने कमी शिकविले जातात. जीवनात कला-संस्कृतीचे महत्त्व मोठे आहे. ते लक्षात घेता या शिक्षणाच्या संदर्भात जागृतीची मोठी गरज आहे. सिनेमा असो अगर कोणतीही कलाकृती या माणसाच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत करतात. त्या दृष्टीने कला क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे. कलेच्या क्षेत्रात सृजनशील निर्मितीसाठी कलाकारामध्ये धाडस असणे अत्यावश्यक आहे, कोणताही शिक्षक हा जातिवंत बंडखोर असला पाहिजे, त्या बंडखोरीतूनच विद्यार्थ्यांना घडविण्याची ऊर्मी जन्माला येत असते, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)