विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण

नायगाव – लॅस्टिक पिशव्यावर बंदी असल्याने अडचणीत सापडलेला व्यापारी आणि ग्राहक यांना दिशा आणि प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम पुरंदर तालुक्‍यातील श्री भैरवनाथ विद्यालय, वनपुरी येथील विद्यार्थ्यानी राबविला. बाजारातील प्लॅस्टिक पिशवीला पर्यायी कागदी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुर्ण केला. टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना घेऊन मुलांनी वापरलेल्या पेपरपासून सौंदर्यपूर्ण फुलांनी सजावट करून सुंदर, वापरण्या योग्य कागदी पिशव्या बनवल्या आणि वातावरणीय बदलाला सामोरे जाण्याचा संदेश देण्याचा उत्तम प्रयत्न केला.

यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक दत्तात्रय परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका लता बोकड, तुकाराम मुळीक, अनिल कदम, विजय गुरव, जनार्दन कांबळे, प्रशांत तांबडे, दत्तात्रय सणस आदींचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष सतिश उरसळ, कार्याध्यध अजित निगडे इतर पदाधिकारी व ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)