विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारात रंगली नाट्यछटा स्पर्धा

पिंपरी – नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने हिंदी व इंग्रजी भाषेत आयोजित केलेल्या कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा निगडी येथे उत्साहात पार पडल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सरस नाटीका सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.

निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड मधील सुमारे 15 शाळा, विद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. नाट्यछटा स्पर्धेचे यंदाचे 28 वे वर्ष होते. या स्पर्धेत विविध वयोगटातून हिंदी भाषेत 114 तर इंग्रजी भाषेतील 56 नाटीका सादर झाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेत हिंदी भाषा नाट्यस्पर्धेत ज्युनिअर गटात आरव लाटे, इयत्ता पहिली व दुसरीच्या गटात नभा कुलकर्णी, इयत्ता तिसरी व चौथीच्या गटातून शाल्मली येळेकर, पाचवी व सहावीच्या गटात सरगम कुलकर्णी आणि सातवी व आठवीच्या गटात सानिका नर्के, तर खुल्या गटातून अनया फाटक यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. इंग्रजी भाषेतील स्पर्धेत अनुक्रमे पर्णवी गाडे, अक्षरा रेड्डी, सान्वी भाके, मृणमयी पवार, सानिका नरके व खुल्या गटातून साक्षी गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्राचार्य हर्षा जोशी, प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाट्य संस्कार कला अकादमीचे विश्‍वस्त प्रकाश पारखी यांनी केले. तर सूत्रसंचालन सुरेखा कामथे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी ओक तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)