विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या -प्राचार्य चाकणे

संग्रहित फोटो

रेडा- व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, असे मत इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी व्यक्‍त केले. इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने युवक महोत्सव आणि इंद्रधनुष्य राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेसाठी ऑडिशन्स घेण्यात आल्या, त्यावेळी प्राचार्य डॉ. चाकणे बोल्त होते. नृत्य, गायन, वाद्य, एकांकिका, पथनाट्य, मुकअभिनय, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, रांगोळी, फोटोग्राफी, चित्रकला, मातीकाम आदी कलाप्रकारांमध्ये 312 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ऑडिशन्समध्ये सहभाग घेतला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युवक महोत्सव, आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय इंद्रधनुष्य सांस्कृतिक, राज्यस्तरीय उत्कर्ष सांस्कृतिक, राष्ट्रीय पातळीवरील पश्‍चिम विभागीय सांस्कृतिक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या आहेत. परीक्षक म्हणून कलाकार स्वामीराज भिसे, रितेश पाटील, संतोष नरुटे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विशाल मोरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. बाळासाहेब पराडे, प्रा. फिरोज शेख, मयूर मखरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)