विद्यार्थ्यांच्या आकाश कंदिलांचा दीपोत्सव

ठोसेघर : विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाशकंदी.

ठोसेघर, दि. 1 (वार्ताहर) – सज्जनगडच्या पश्‍चिमेस असलेल्या दुर्गम व डोंगराळ भागातील मोरबाग जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः बनवलेले आकाशकंदील ताकवली मुरा व मोरबाग गावात वाटप करून दिवाळी सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे.
परळी खोऱ्यातील मोरबाग या दुर्गम भागात आजही मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे दिवाळी सणाचा उत्साह शहराप्रमाणे पाहावयास मिळत नाही. परंतु, यावर्षीची दिवाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खास बनवली आहे. गणेश शिंदे या शिक्षकाच्या कल्पकतेने यावर्षी आकाश कंदील बनवण्याची अनोखी कार्यशाळा मोरबाग जिल्हा परिषद शाळेत पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशकंदील तयार केले आहेत. हे आकाश कंदील ताकवली, मुरा व मोरबाग गावांमध्ये वाटप करून यंदाचा दीपोत्सव विद्यार्थ्यांन मार्फत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी भेट दिलेले आकाशकंदील पाहून मोरबाग, ताकवलीमधील ग्रामस्थांचा चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. विद्यार्थ्यांनी आकाशकंदील बनवण्याचे कार्यशाळेस मुख्याध्यापक विश्वास कवडे, शिक्षक राहुल सावंत, गणेश शिंदे, विजय कदम यांनी मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)