“विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा’

मकरंद टिल्लू यांचे मत : गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांचा स्मृतिदिन

पवनानगर – विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक व्हा, विद्यार्थ्यांचा अवघड विषय आपोआप आवडता होईल, असे मत हास्यतज्ज्ञ मकरंद टिल्लू यांनी तळेगाव येथे व्यक्‍त केले. तळेगाव येथील नूतन इंजिनिअंरिग कॉलेजमध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या 92 व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मकरंद टिल्लू प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

-Ads-

या सभेस अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे हे होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव दादा खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्यासह संस्थेचे आजी-माजी मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना टिल्लू म्हणाले की, शिक्षकांनी नेहमी सकारात्मक असले पाहिजे, कारण सकारात्मक पणामुळे आपले कोणतेही काम सहज होऊ शकते तसेच “प्रत्येकाने जगण्यासाठी हसा व हसण्यासाठी जगा’ या तत्वाचा अवलंब केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने हास्य विनोदाचा वापर शिक्षण पद्धतीत अवलंबविल्यास अध्यापन पद्धती व अध्ययन पद्धती सहज सोपी होईल.

त्याचप्रमाणे पाणी गळतीवर भाष्य करताना मकरंद टिल्लू म्हणाले की, भविष्यात पाणी संकटाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागेल, त्यासाठी प्रत्येकाने पाणी बचतीची चळवळ उभी केली पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाना आपला वाढदिवस साजरा करताना गावातील परिसरातील अथवा आपल्या भागातील गळके व नादुरूस्त नळ दुरूस्त करून साजरा करावा, असे केल्याने मोठी समाजसेवा घडेल, असे त्यांनी सांगितले.

प्रास्तविकात संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, भविष्यकाळात संस्थेला चांगले भविष्य असून त्यासाठी नवनवीन शैक्षणिक दालने उभारणे गरजेचे आहे. लवकरच सोशल मीडियाच्या या काळात टिकून राहायचे असेल, तर बदल आवश्‍यक आहे. लवकर संस्थेच्या सर्व शाळा, कॉलेज आयएसओ मानंकन प्राप्त होतील. त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे, तर संस्थेत स्कील डेव्हलपमेंट सुरू करून अनेकांना रोजगार प्राप्त देण्यासाठी संस्थापतळीवर प्रयत्न सुरू आहेत.

अध्यक्षीय भाषणात आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले की, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेला एक ऐतिहासिक वारसा असून स्पर्धेच्या युगात टिकून राहाचे असेल, तर इतरांबरोबर बदल आवश्‍यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची गरज आहे. महाराष्टात संस्थेचे नावलौकिक होण्यासाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाशी सामंजस्य करार करून संस्थेतील अनेक मोठ्या कंपन्यांशी करार केला. येथे शिक्षण घेणाऱ्या तरूणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या वेळी यावर्षी गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर शिक्षकेत्तर पुरस्कार पैसाफंड प्राथमिक शाळेतील लिपीक सुविधा नामजोशी यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार पवना विद्या मंदिर पवनानगर येथील प्राचार्या प्रीती जंगले यांनी प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक आदर्श शाळा पुरस्कार इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर या शाळेला प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी व बारावी या शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पवना विद्या मंदिर व पवना ज्युनिअर कॉलेज पवनानगर शाळेने केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे भांडारप्रमुख पांडुरंग पोटे शाळेच्या प्राचार्या प्रीती जंगले, पर्यवेक्षिका निला केसकर यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन पवना विद्या मंदिराचे अध्यापक भारत काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले. सोनबा गोपाळे यांनी आभार मानले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)