विद्यार्थ्यांकडून यात्रा परिसर चकाचक

ओतूर-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना, व अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात मंगळवारी (दि. 28) स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
ओतूर येथे श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वर यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांकडून गावामध्ये अस्वच्छता होत असते. त्यामुळे आज वाघिरे महाविद्यालयामधील एनसीसी व एनसीसी विद्यार्थी यांच्या मदतीने सर्व परिसरामध्ये स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान राबवले. विद्यार्थी यांनी सर्व परिसर महाविद्यालयाचे प्राचार्य साळवे व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ केला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी दोन लाखांपेक्षा जास्त भाविक कपर्दिकेश्वराला आलेले होते. त्यामुळे या परिसरात प्लॅस्टिक कागद, प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाटल्या, साधे कागद व ओला कचऱ्याचा खच जमा झाला होता. प्लॅस्टिक कागद ओला व सुका कचरा जमा करुन गावाबाहेर टाकला. तसेच कॉलेजच्या एनसीसी विद्यार्थीनी यांनी ओतूर पोलीस ठाण्यामधील सर्व कर्मचारी यांना राखी बांधून पोलिसांविषयी आपुलकी जपली. या कार्यक्रमास ओतूर गावचे सरपंच बाळासाहेब घुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे, शिक्षक बागूल, सोनवणे, देशमुख, काळे, वायकर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)