पुणे: विद्यार्थी गावात करणार 100 तास स्वच्छतेचा जागर

शंभर दिवसांतील अपेक्षित उपक्रम –
– स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करणे
– पथनाट्य सादर करणे
– स्वच्छता मेळे, गायन, नृत्यातून मार्गदर्शन
– घरोघरी गाठीभेठी
– स्वच्छता फेऱ्यांचे आयोजन
– स्वच्छतेविषयीचे चित्रपट दाखविणे
– कचरा गोळा करण्याची मोहीम
– ओला व सुका कचरा वेगळा करणे
– बायोगॅस उभारणीसाठी मदत करणे
– रस्ता, गटार स्वच्छ करणे

अनुदान आयोगाकडून “स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ मोहीम

सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार दोन शैक्षणिक श्रेयांक

पुणे – स्वच्छ भारत अभियानांतर्गत उन्ह्याळी सुट्ट्यांमध्ये एखाद्या गावात शंभर तास स्वच्छतेचा जागर केल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दोन शैक्षणिक श्रेयांक (क्रेडीट) मिळणार आहेत. तसेच, सहभागाचे प्रमाणपत्र आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांना रोख रकमेचे बक्षिसही दिले जाणार असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने “स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ ही मोहीम हाती घेतले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्ट्यामध्ये गावा-गावांमध्ये स्वच्छतेचा जागर करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने शुक्रवारी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार या मोहिमेत शंभर दिवस सहभागी होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट पॉईंट दिले जाणार आहेत. ही मोहिम दि. 1 मे ते 31 जुलै या कालावधीत राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक किंवा दहा जणांचा गट करून एक किंवा अधिक गावे दत्तक घ्यावी लागतील. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाच यामध्ये सहभाग घेता येईल. या मोहिमेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ करण्यात आले असून दि. 25 एप्रिल ते 15 मे या कालावधीत नोंदणी करता येईल.

या मोहिमेसाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागेल. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची नोंदणी, गावाची निवड, नियंत्रण, पुढील फेरीसाठी निवड, विद्यार्थ्यांची सुरक्षितता याची जबाबदारी असेल. विद्यार्थ्यांनी शंभर दिवस केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल. महाविद्यालयाकडून शिफारस करण्यात आलेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर दोन क्रेडीट पॉईंट्‌स, स्वच्छ भारतचे प्रमाणपत्र मिळेल. तसेच उत्कृष्ट काम केलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय पातळीवर सन्मानित केले जाणार आहे.

नोंदणीसाठी संकेतस्थळ – https://sbsi.mygov.in


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)