विद्यार्थी वाहतूकदारांची मानवाधिकार संघटनेकडे धाव

वाकड – विद्यार्थी वाहतूकदार चालक-मालकांनी शाळा व्यवस्थापन व आरटीओ कार्यालयाच्या विरोधात मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली आहे. स्कूल बस चालक-मालक विद्यार्थी आणि पालकांशी उद्धट वागतात, अरेरावी करतात, अशी तक्रार शाळा व्यवस्थापनाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली. याची गंभीर दखल घेऊन स्कूल बस चालक-मालकांना मेमो देऊन परवाना रद्द करण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्याची घटना नुकतीच काळेवाडी येथील एका इंग्रजी माध्यम शाळेत घडली. याबाबत शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी वाहतूकदार आणि परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली.

अचानक झालेल्या कारवाईमुळे सर्व चालक मालकांनी मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांना घटनेची पूर्ण शहानिशा करुन कारवाई करण्याची विनंती निवेदनात केली होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस चालक-मालकांशी ताबडतोब बैठक घेतली. चर्चेतून केलेली कारवाई मागे घेतली.
याबाबत संघटनेचे सचिव तानाजी मांडवे यांनी सांगितले की गेली 20 वर्षांपासून स्कूल बस चालक विद्यार्थी वाहतूक करतात. मात्र अचानक शाळा व्यवस्थापनाकडून एकाच वेळेस सर्वच बस चालकांविरोधात तक्रार करण्यात आल्याने गोंधळलेल्या बस चालकांनी आमच्या संघटनेकडे धाव घेतली. त्यामुळे आम्ही परिवहन अधिकारी पाटील यांना दोघांची बाजू ऐकून कारवाई करा, तसेच आपल्याकडून अधिकाराचा गैरवापर होणार नाही, याबद्दल काळजी घेण्याची विनंती केली.

शासन नियमानुसार शाळेत वाहतूक व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे आणि या समिती मार्फत अशा तक्रार करणे अपेक्षित असल्याचे परिवहन अधिकारी पाटील यांनी बैठकीमधे स्पस्ट केले. यावेळी मानवाधिकार संघटनेचे सचिव तानाजी मांडवे, एम. डी. चौधरी, खंडू कटारे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, परिवहन अधिकारी विजय मोरे, शाळेचे मुख्याध्यापक, बस चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलेले मेमो मागे घेण्यात आल्याने बस चालकांनी मानवाधिकार संघटनेचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
10 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)