विद्यार्थी वसतीगृह दहा दिवसांपासून अंधारात

श्रीगोंदा – तालुक्‍यातील कामठी परिसरासह कामठी विद्यालय व महकालीका विद्यार्थी वसतीगृह गेल्या दहा दिवसांपासून अंधारात आहे. गेल्या दहा दिवसांपासून या परिसराचा वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार करून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, गेल्या पंधरवड्यात कामठी शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळात विजेचे व तारांचे नुकसान झाले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे कामठी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यातच या शिवारात कामठी विद्यालय व महाकालिका विद्यार्थी वसतीगृह आहे. या विद्यार्थ्यांना देखील अंधारात चाचपडावे लागत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात वीजपुरवठा खंडित असल्याने कामठी परिसर व वसतिगृहात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या प्रकाराला दहा दिवस उलटून गेले तरीही महावितरण याकडे गांभीऱ्याने बघायला तयार नाही.
कामठी व परिसरातील वादळात पडलेल्या विजेच्या खांबांची तत्काळ दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी कामठीच्या सरपंच जनाबाई आरडे, उपसरपंच लता शिंदे, ग्रामसेवक डी.एच.मेहेत्रे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे केली आहे.
दहा दिवस उलटूनही महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत न झाल्याप्रसंगी विद्यार्थ्यांसह महावितरणविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)