विद्यार्थी, पालकांची चिंता दूर करण्यासाठी “बालभारती’चा पुढाकार

संकेतस्थळावर दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल मिळणार मार्गदर्शन

पुणे – दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत असतील. मात्र, ही चिंता दूर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी “बालभारती’ने पुढाकार घेतला आहे. दहावी परीक्षार्थींसाठी बालभारतीच्या संकेतस्थळावर सर्व विषयाच्या सराव प्रश्‍नपत्रिका, त्याचे प्रमाणित उत्तराचा नमुना, योग्य उत्तरासाठी मार्गदर्शन आणि एवढेच नव्हे, तर तज्ज्ञांचे व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा महत्त्चाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या वर्षापासून दहावीच्या भाषा आणि समाजशास्त्र विषयाची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. परिणामी, दहावीचे अंतर्गत गुण कमी होणार आहेत. त्याचाच परिणाम दहावी विद्यार्थ्यांना गुण कमी मिळतील, अशी भीती पालकांतून व्यक्‍त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बालभारतीतर्फे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दहावीचा अभ्यासक्रम बदलला असला तरी, शिक्षकांना त्या प्रमाणात प्रशिक्षण देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमाचे भिती बाळगण्याचे आणि गुणही कमी पडण्याची भीती आता दूर होण्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक सुनील मगर म्हणाले, दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाचा विचार करून यावर्षी बालभारतीच्या संकेतस्थळावर सराव परीक्षांचा प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थी सराव परीक्षा देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम आणि शंभर गुणांची परीक्षा देताना कशी तयारी करावी, हेही विद्यार्थी व शिक्षकांना समजणार आहे. एवढेच नव्हे, तर जी प्रश्‍नपत्रिका दिली आहे. त्याचे उत्तरांचा नमुनाही प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना किती गुण पडले, किती चुका झाल्याची खातरजमा करणे शक्‍य होणार आहे. त्यानुसार परीक्षेची तयारी करावे लागणार आहे. प्रश्‍नपत्रिका सोडविताना काय चुका झाल्या आहेत, त्याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबाबत तज्ज्ञांचे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तणावमुक्‍त वातावरणात परीक्षेला जातील, असा विश्‍वास आहे.

मार्गदर्शनासाठी “बालभारती’कडून तयारी सुरू
दहावीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सराव प्रश्‍नपत्रिका, त्याची उत्तरे, मार्गदर्शन याबाबत बालभारतीकडून तयारी सुरू आहे. सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. ही सर्व प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे सराव प्रश्‍नपत्रिका संकेतस्थळावर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील, अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)