विद्यार्थी निवडणुका लवकर व्हायला हवेत!

पुणे – महाराष्ट्रात नवीन विद्यापीठ कायदा लागू करण्यात आला. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांची तरतूद आहे. त्यानुसार सरकारने लवकरात लवकर विद्यार्थी निवडणुका घेतल्या पाहिजेत, अशी मागणी करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) या निवडणुकांत विजयी मिळविणार असल्याचा दावा केला आहे.

“अभाविप’चे राष्ट्रीय महामंत्री आशिष चव्हाण यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत, विद्यार्थी निवडणुकांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संघटनेच्या नव्या अभियानाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, नवे शैक्षणिक धोरणासाठी संघटनेने पाठपुरावा केला होता. परंतु अजूनही ते लागू झाले नाही. सरकारकडून दरवेळेस नवी डेडलाईन दिली जात आहे. अजून विलंब न करता शासनाने धोरणाची अंमलबजावणी केली पाहिजे. दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नुकत्याच झालेल्या विद्यार्थी निवडणूकीत “अभाविप’ला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे ते म्हणाले.

भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्येही “अभाविप’ने आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. काही आंदोलनांमध्ये तर संघटनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आहे. तर बिगर भाजपशासित राज्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

चौकट :
“अभाविप’ने देशभरात मिशन साहसी, संवाद अभियान आणि सेल्फी विथ कॅम्पस हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. या अभियानातून 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात 30 ऑक्‍टोबरपासून या अभियानाला सुरवात होणार आहे. पुण्यात 10 नोव्हेंबरपासून हे अभियान सुरू होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)