विद्यार्थी निवडणुकांची सत्त्वपरीक्षा

प्रवेश प्रक्रियेत ठरणार तापदायक : 30 सप्टेंबरपूर्वी करण्याचे निर्बंध

– व्यंकटेश भोळा

पुणे – राज्य शासनाने महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, विद्यार्थी निवडणुकीची प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी करण्याचे निर्बंध आहेत. परिणामी, ऐन प्रवेश परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी निवडणुका घेणे विद्यापीठ व महाविद्यालयांना अडचणीचे होणार आहे. त्यामुळे प्रवेशाच्या काळात विद्यार्थी निवडणुका घेणे मोठे जिकिरीचे होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र शासनाने दि.26 ऑक्‍टोबर रोजी अध्यादेश जारी करून येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले. त्याबाबतचे परिनियम, आचारसंहिता, पात्रता, कार्यपद्धती ही प्रसिद्ध करण्यात आली. त्याला अनुसरून विद्यापीठांना महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. या निवडणुकांविषयी कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्यावेळेत विद्यार्थी निवडणुका घ्यावेत, असेच सूचित करण्यात आले आहे.

विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम तयार करणे, निवडणुका घेणे, अधिसूचा काढने, वेळापत्रक या सर्वबाबी दि. 31 जुलै पूर्वी करणे अनिवार्य आहे. त्याच दरम्यान उच्च शिक्षण विभागातील सर्व अभ्यासक्रमांचा प्रवेशाचा काळ असतो. प्रत्येक विद्यार्थी प्रवेशासाठी धडपड करीत असतो. त्याच कालावधीत विद्यार्थी निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होणे, याकडे काही शिक्षणतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचा कालावधी आहे. विद्यार्थ्याने नुकताच प्रवेश घेतलेला असतो, ते विद्यार्थी निवडणुकांना सामोरे जातील, या विषयी साशंकता आहे.

विद्यार्थी विकास मंडळ
विद्यार्थी निवडणुका घेण्यात विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यांच्याकडेच विद्यार्थी निवडणुकांची जबाबदारी आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व महाविद्यालयात विद्यार्थी होतील, असेच परिनियमात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी निवडणुकांची अधिसूचना जाहीर होताच, सर्वच महाविद्यालयात वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे हे मोठे आव्हान विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांपुढे उभे राहिले आहे.

विसंगती
ऐन परीक्षांच्या कालावधीतच महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेणे, हे विसंगत आहे. अशीच भावना शिक्षण क्षेत्रातील घटकांमध्ये निर्माण होत आहे. एकीकडे प्राचार्यांसह सर्व स्टाफ प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत असतात. त्यानंतर लगेच विद्यार्थी निवडणुका घेणे, त्याची पारदर्शकपणे अंमलबाजवणी करण्यासाठी आता डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालय यांच्या समन्वयातूनही विद्यार्थी निवडणुका घेण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, हे मात्र निश्‍चित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)