विद्यार्थी घडवण्याची ताकद मुल्य शिक्षणामध्येच – बोऱ्हाडे

पिंपरी – प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असणारे संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याची ताकद मुल्य शिक्षणामध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ गुणांच्या टक्केवारीला महत्त्व न देता, त्यांच्यातील कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य इत्यादी अंगभूत आवडींना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन साहित्यिक व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.

पिंपरीतील हिंदुस्थान अन्टिबायोटिक्‍स (एच. ए.) माध्यमिक शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोऱ्हाडे बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोऱ्हाडे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता, ध्येय निश्‍चीत करुन प्रगतीकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळाप्रमुख एकनाथ बुरसे यांनी प्रशालेतील विविध कलांवर आधारित 110 उपक्रमांची रचना व प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा उल्लेख केला. त्यानंतर अरुण बोऱ्हाडे व गितांजली बोऱ्हाडे यांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे उद्‌घाटन झाले. शालेचे उपशालाप्रमुख सुनील शिवले यांनी प्रशालेच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण प्रोजेक्‍टरच्या सहाय्याने केले. शाळेत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, देशभक्तीपर आधारित नृत्य, एकपात्री नाट्य यांचे प्रभावीपणे सादरीकरण केले. सूत्रसंचालन कविता गायकवाड यांनी केले. तर आशा माने यांनी आभार मानले. कार्याध्यक्षा शिल्पा राशिनकर, डॉ. वंदना घांगुर्डे, स्नेहल देशपांडे, अनिलता भामरे, विजया तरटे, चंद्रकला मुसळे, विजय अपामार्जने, पोपट माने, प्रताप पवार, मुकेश पवार आदींनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)