विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीला अग्रक्रम

डॉ. भूषण पटवर्धन : तिसऱ्या नॅशनल टीचर्स कॉग्रेसचे उद्‌घाटन

पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि कला यावर आधारित अभ्यासक्रम देण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी यूजीसी प्रयत्नशील आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित तिसऱ्या नॅशनल टीचर्स कॉंग्रसचे उद्‌घाटन डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष व टीचर्स कॉंग्रेसचे संस्थापक प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. पी. सी. शेजवलकर, एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल डी. सहस्त्रबुद्धे, डॉ. एस. जे. चोप्रा व डॉ. पराग दिवाण यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

प्रा. डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, देशात चांगल्या शिक्षणासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत फेरबदल करणे गरजेचे आहे. यासाठी यूजीसीने आठ नियम बनविले आहे. यात ऑटोनॉमीमधील आवडीनुसार विद्यार्थ्यांना विषयाची निवड करता यावी. स्टेम या विषयासोबत कृषी या विषयाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंडक्‍शन प्रोग्राम, शिक्षकांसाठी इंडक्‍शन प्रोग्राम तयार करून त्यांना एका महिन्याचे प्रशिक्षण द्यावे. तसेच विद्यार्थ्यांची स्किल डेव्हलप करून त्यांच्यातील संवाद कौशल्याची वाढ करणे आवश्‍यक आहे. नॅशनल क्रेडीट बॅंड तयार करण्याचीही आवश्‍यकता आहे.

विजय भटकर म्हणाले, ज्ञान, तत्त्वज्ञान आणि माध्यमातून भारत विश्वगुरू बनेल, त्यासाठी नॅशनल टीचर्स कॉंग्रेससारखे व्यासपीठ नक्‍कीच मदतीचे ठरेल.

प्रा. राहुल कराड म्हणाले, शिक्षकाचे समाज घडविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. आईवडिलानंतर शिक्षकच हा महत्त्वाचा गुरू आहे, म्हणून शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे, हाच या परिषदेचा उद्देश आहे. याप्रसंगी “सिल्वन्ट’चे आनंद सुदर्शन, डॉ. सच्चिदानंद जोशी, समन्वयक डॉ. जय गोरे, राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, महासचिव डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. चंद्रकांत पांडव आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)