विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा

अपमानास्पद वागणूक दिल्याचा पालकांचा आरोप
सातारा,दि. 2(प्रतिनिधी)
साताऱ्यातील गुरुवार पेठेत राहणाऱ्या अयान इम्रान शेख (वय 13) या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी अयान याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शाळेत कॉपी पकडल्यानंतर त्याला शाळेत मुख्याध्यापकाने अपमानास्पद वागणूक दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याची तक्रार अयानच्या पालकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
मृत अयान हा प्रतापगंज पेठेतील ईक्रा स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. शुक्रवारी शाळेची परीक्षा सुरू होती. परीक्षेदरम्यान त्याने कॉपी केली होती. कॉपी पकडल्यानंतर शिक्षकांनी त्याला मुख्याध्यापकासमोर उभे केले केले होते. त्यावेळी मुख्याध्यापक जावेद आतार याने अयान याला सर्व वर्गात फिरवत क्षमा मागण्यास सांगा असे,आकाश नावाच्या शिक्षकाला सांगितले. मुख्याध्यापकाने सांगितल्याप्रमाणे आकाश नावाच्या शिक्षकाने त्याला सर्व वर्गात फिरवत “”सॉरी मी कॉफी केली” असे म्हणायला लावले. त्यामुळे अयान हा तणावात होता. तेव्हापासून तो शांत व झोपूनच होता. शनिवारी दुपारी घरात कोणी नव्हते. याचवेळी त्याने घरी गळफास घेवून आत्महत्या केली. असे अयानची आई मिनाज शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. शेख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावेद आतार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. याचा तपास स.पो.नि. सुभाष चौगुले करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)