विद्यार्थी अपहरण प्रकरणातील आरोपीला उद्या पर्यंत कोठडी

चाकण- येथील विद्यानिकेतन शाळेतील पाच वर्षीय विद्यार्थीच्या अपहरण प्रकरणातील एक वर्षापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे पथकाने नाशिकमधून अटक केली असून या आरोपीस गुरुवार (दि. 29) पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली.
संतोष रामभाऊ कड ( वय 23, रा. पिंपळखुटा, ता. मंगरूळपीर, जि.वाशीम ) असे कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. तर रुद्र प्रवीण कोळेकर (रा. मेदनकरवाडी, चाकण, ता.खेड) याचे मागील वर्षी 24 मार्च 2017 रोजी अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. 26) रात्री नऊच्या सुमारास तब्ब्ल एक वर्षाने नाशिक जिल्ह्यातील भोयेगाव (ता. चांदवड ) येथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक निरीक्षक महेश मुंडे, हवालदार विठ्ठल कुंभार, पोलीस नाईक अमोल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)