विद्यार्थीनींना शिक्षणासाठी आर्थिक मदत

इंदोरी – परिसरातील प्रगती विद्या मंदिर इंदोरी, सरस्वती विद्या मंदिर तळेगाव, भैरवनाथ विद्या मंदिर वराळे, जि. प. प्राथमिक शाळा वाकी, माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या पाच शाळांतील 25 विद्यार्थीनींना आरपीजी रैचिम फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला.

दि. 28 रोजी प्रगती विद्या मंदिर, इंदोरी येथे पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी 1500 रुपये कार्यक्रमात देण्यात आले. तसेच गुणात्मक विकास व्हावा यासाठी त्यांना दोन दिवसाचे प्रशिक्षण इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिरात दिले.

प्रगती विद्या मंदिरचे प्राचार्य दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षक बलभीम भालेराव, समन्वयक राजेंद्र वाजे, आर. पी. सी. चे अधिकारी शर्लीन व जस्टीन यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. नेत्रांजली ग्रुपच्या शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थीनी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)