विद्यार्थीदशेतच जीवनाची दिशा ठरवा : अशोक गार्डे

बुध – आदर्श नागरिक व आदर्श व्यक्ती म्हणून जगायचे असेल तर विद्यार्थी दशेतच जीवनाची दिशा ठरवणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन मुंबई हेल्प ट्रस्टचे संस्थापक व प्रसिध्द लेखक अशोक गार्डे यांनी केले. मुंबई हेल्प ट्रस्ट अंतर्गत राजापूर, ता. खटाव येथील हेल्प सेंटरतर्फे राजापूर हायस्कुलमधील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप व निराधार मुलांना शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

ट्रस्टचे अनुराग मिश्रा, हिमांशू रॉय, सिध्दार्थ मोहिते, जयवंतराव डंगारे, सरपंच काकासो डंगारे, कविता घनवट, उषा कचरे, शंकर शिंदे, कविता तारळकर, सुनिता घनवट, मुख्याध्यापक अशोक वळवी, शामराव कदम, बळीराम सुर्यवंशी, विनोद घनवट, संपत वावरे, बाळू गार्डे, हौसाबाई गार्डे, किसन घनवट, यशवंत घनवट, बापूराव घनवट, किसन म्हेत्रेसह जानुबाई महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. गार्डे म्हणाले, जीवनात आपणास काय व्हायचे आहे, याची बीजे विद्यार्थीदशेतच पेरली जातात. म्हणून आतापासूनच जीवनाचे उद्दीष्ट ठरविले तर येणारा काळ सुवर्णदायी असेल. यावेळी रवींद्र तारळकर, शंकर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनुराग मिश्रा यांच्या हस्ते सायकल वाटप तसेच निराधार विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. सुत्रसंचालन दीपक घनवट यांनी केले. विलास जाधव आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)