विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना प्राधान्य देणार

मंचर- शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता लागते, कागदपत्रे कोणती लागतात, त्याचबरोबर विद्यार्थी स्वयंशासित महाविद्यालयातील भौतिक सुविधा, विद्यार्थी उपस्थिती आणि विद्यार्थ्यांमध्य सर्वांगीण गुणात्मक वाढ इत्यादींविषयी आपण आग्रही आहे. विद्यार्थीकेंद्रित अनेक उपक्रमांना यापुढील काळात प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन प्राचार्य नानासाहेब गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिले.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर प्राचार्य नानासाहेब गायकवाड यांनी संवाद साधला. यावेळी उपप्राचार्य सोमनाथ वामन, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विष्णुपंत देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य गायकवाड यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिल्लक योजना, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती विद्यार्थी निर्वाह भत्ता, केंद्रिय मेरीट शिष्यवृत्ती अशा केंद्रिय आणि राज्यस्तरीय, तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती सांगून अर्थ योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. या प्रक्रियेत महाविद्यालय आपणास पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही प्राचार्य गायकवाड यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विष्णुपंत देशमुख यांनी केले तर आभार उपप्राचार्य सोमनाथ वामन यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)