विद्यार्थिनीचा विनयभंग

पिंपरी – फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम सुधीरकुमार दुबे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत एका वीस वर्षीय विद्यार्थिनीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दुबे एका लॉ कॉलेजमध्ये शिकत आहे. सन 2016 ते 11 एप्रिल 2018 दरम्यान दुबेने तरुणीचा वेळोवेळी पाठलाग केला, तसेच तिला तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणी अखेर विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दुबेवर गुन्हा दाखल करुन पुढील तपास हाती घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)