विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे करणा-या शिक्षकाला अटक

यवतमाळ – आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींशी शिक्षकानेच अश्‍लील चाळे केल्याची घटना घडली. सतीश जाधव असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी सतीश जाधवला बेड्या ठोकल्या आहेत.

शिक्षकाच्या या कृत्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने आश्रमशाळा अधीक्षिकेकडे तक्रार केली. त्यानंतर आणखी दोन मुलींसोबत हा प्रकार झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पीडित मुलींच्या तक्रारीनंतर बाभूळगाव पोलिसांनी सतीश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)