पिंपरी – राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस व पीडीसीसी बॅंकेच्या वतीने आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, पीडीसीसी बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती संघटक वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख, प्राचार्य चासकर, नगरसेवक निलेश पांढारकर, सुलक्षणा शिलवंत-धर तसेच संजय लंके, अमोल भोईटे, लाला चिंचवडे, पल्लवी पांढरे, कविता खराडे, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते.

वर्षा जगताप यांनी उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या कशा तयार करावयाच्या त्याचे फायदे व त्याव्दारे मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत, सविस्तर माहिती दिली. सोनाली घाडे यांनी कागदी पिशव्यांचे प्रशिक्षण दिले. 300 विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. यानंतर महिला बचत गटांनाही हे प्रशिक्षण देण्यात आले. सूत्रसंचलन सविता कुलकर्णी यांनी केले. सारिका मोहोळ यांनी आभार मानले. महिला बचत गटातील महिलांना देखील मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)