विद्यार्थिनींची कळकराय सुळक्‍यावर चढाई

पिंपरी – जागतिक मातृ दिनानिमित्त निगडीतील अमृता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मावळ तालुक्‍यातील ढाक भैरी किल्ल्यालगत असलेला 150 फुट उंच कळकराय सुळक्‍यावर यशस्वी चढाई केली आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने मातृ दिन साजरा केला.

एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत चेलुवी ढोकले, आकांक्षा पवार, श्रेया बधे, मानसी मगर, प्रथम पिंगळे, ओम कांबळे, प्रशांत भरगुडे, साहिल कांबळे, गौरव लांघे, धनराज साळवी, महेश सस्ते, अविनाश पिंगळे, प्रचिकेत काळे, संजय बधे, किरण मगर, विनोद कांबळे यांनी सहभाग घेतला. मोहिमेस पिंपरी – चिंचवड माऊंटेनिअरिंग क्‍लब या संस्थेने तांत्रिक मदत केली. विद्यार्थिनींनी शाळेतील क्‍लायंबिंग वॉल व शाहूनगर येथील दगडाच्या खाणीत सराव केला.

पहाटे पाच वाजता मोहिमेला सुरूवात झाली. ढाक भैरी किल्याच्या खिंडीजवळ निसर्गदेवतेची पूजा करून चेलुवी ढोकले हिने प्रथम चढाईस सुरवात केली. पहिला 60 फुटांचा टप्पा पार करून आकांक्षा पवार हिला वर घेतले. उन्हाचा त्रास, त्यातच तापलेले दगड, पश्‍चिम दिशेची खोल दरी आणि वाछयाचा प्रचंड वेग असे नैसर्गिक अडथळे पार करत, सावध चढाई करत चेलुवीने सुळक्‍याचा माथा गाठला. तसा सर्वांनी जय भवानी… जय शिवाजी असा जयघोष केला. त्यानंतर एकामागोमाग एक करत सर्वांनी सुळक्‍याच्या माथ्यावर चढाई केली. माथ्यावरुन सर्वांनी आपल्या आईला मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)