विद्याभवन करंडक आंतरशालेय फुटबॉल: विद्या भवन, जेएन पेटीट, लॉयला स्कूल संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे: विद्या भवन, जेएन पेटीट, लॉयला स्कूल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या विद्या भवन स्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय तर्फे आयोजित विद्याभवन करंडक आंतरशालेय फुटबॉल (14 आणि 16 वर्षाखालील गट) स्पर्धेत आपापल्या गटातून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

विद्या भवन हायस्कूलच्या मॉडेल कॉलनी मैदानावर असलेल्या या स्पर्धेच्या 14 वर्षाखालील गटात जेएन पेटीट संघाने सेंट व्हिन्सेंट संघाचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. जेएन पेटीटच्या स्वराज शेलार याने दोन गोल तर, हृषीकेश व्हि. आणि अरमान शेख यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. सेंट व्हिन्सेंट संघाकडून केविन सी. व भार्गव सी. यांनी गोल केले. तर, दुसऱ्या सामन्यात इशान व अक्षित डी. यांनी केलेल्या गोलच्या जोरावर लॉयला स्कूलने विद्या भवन संघाचा 2-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली.

-Ads-

तर, 16 वर्षाखालील गटाच्या झालेल्या स्पर्धेत आयोजक विद्या भवन संघाने एसएसपीएमएस बोर्डींग संघाचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. यात श्रेयस जगताप याने 3 गोल तर, शौनक ताम्हणकर व अनिश गवारे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

सविस्तर निकाल :

14 वर्षाखालील गट –
जेएन पेटीटः 4 (हृषीकेश व्हि. 18 मि., स्वराज शेलार 25, 30 मि., अरमान शेख 32 मि.) वि.वि. सेंट व्हिन्सेंटः 2 (केविन सी. 13 मि., भार्गव सी. 25 मि.), लॉयला स्कूलः 2 (इशान 5 मि., अक्क्‌षत डी. 21 मि.) वि.वि. विद्या भवनः 0.
16 वर्षाखालील गटः विद्या भवनः 5 (श्रेयस जगताप 1, 3, 15 मि., शौनक ताम्हणकर 7 मि., अनिश गवारे 27 मि.) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डींगः 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)