“विद्याभवन’माध्यमातून घडताहेत आदर्श विद्यार्थी

अजित करंदीकर : शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

पिरंगुट- विद्याभवन शाळा ही ग्रामीण भागातील शाळा आहे. ग्रामीण भागात असूनही शहरी शाळेच्या तोडीस तोड अशा सुविधा विद्यार्थ्यांना येथे मिळत आहे. आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम या शाळेच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन उद्योजक अजित करंदीकर यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील श्री विद्याभवन इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी करंदीकर बोलत होते. यावेळी शंकर मांडेकर, अंजली कांबळे, राजाभाऊ हगवणे, बबनराव दगडे, शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे, विजय केदारी, सरपंच मंदा पवळे, उपसरपंच दिलीप पवळे, राम निकटे, दगडूकाका करंजावणे, प्रकाश पवळे, चांगदेव पवळे, सुनील वाडकर, संतोष मोहोळ, रमेश पवळे, वैभव पवळे, दिपक करंजावणे, आबासाहेब शेळके, संगिता पवळे, गंगाराम मातेरे, जीवनमामा खाणेकर, प्रकाश भेगडे, दिलीप गोळे, रामदास पवळे, महादेव गोळे, दीपक गोळे, विजय सातपुते, संगिता पवळे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल साठे, प्राचार्या सुचित्रा साठे, अविनाश बलकवडे, अल्पना वरपे, ललिता पवळे, सुप्रिया धोत्रे, हेमलता मंडले, ज्ञानेश्वर पवळे, संतोष दगडे, चांगदेव निकटे, छाया पवळे, शेखर गोळे, भानुदास गोळे, जालिंदर पवळे, जितेंद्र इंगवले, दत्तात्रय मारणे, उमेश पवळे, विकास पवळे, महेश वाघ, विशाल पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विविध क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवात महाराणा प्रताप हाऊसने बाजी मारली. उत्कृष्ट संचलनाचे तसेच बेस्ट चॅम्पियन बरोबरच कबड्डीचे पारितोषिक मिळवले. क्रिकेट स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज हाऊसने बाजी मारली. उत्कृष्ट खेळाडू म्हणून तेजश्री कुडले व आशिष सिंग यांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. प्राचार्या सुचित्रा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महोत्सवाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालन प्रा. संतोष गावडे तर आशिष काटे यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)