विद्यापीठ सल्लागार समिती सदस्यपदी डी. डी. थोरात

कोल्हापूर : डी. डी. थोरात यांचा सत्कार करताना कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे व इतर.

कराड, दि 29 (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्यपदी बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण मधील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी. डी. थोरात यांची चार वर्षासाठी निवड झाली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या या राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे हे अध्यक्ष आहेत. प्रा. डी. डी. थोरात यांनी बाळासाहेब देसाई महाविद्यालयात 14 वर्षे कार्यक्रम अधिकारी व तीन वर्षे विभागीय एन. एस. एस. समन्वयक म्हणून काम केले आहे. यापुर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून गौरव केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, प्रकाशभाऊ पाटील, प्राचार्य एस. डी. पवार आदींनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)