विद्यापीठ कायद्यानुसार प्रकुलगुरूंची नियुक्‍ती – कुलगुरू डॉ. करमळकर

पुणे – नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्रकुलगुरू व अधिकार मंडळावर कुलगुरूंच्या अधिकारातून नामनिर्देशनानुसार होणार आहेत. विद्यापीठाच्या प्रकुलगुरू आणि अधिकार मंडळावरील नियुक्‍ती ही गुणवत्तेच्या आधारे केली जातील, अशी ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी आज दिली.
डॉ. करमळकर यांनी कुलगुपदाची गुरुवारी सूत्रे स्वीकारल्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधला. कुलगुरूंची निवड झाल्यानंतर आता प्रकुलगुरू, अधिष्ठाता आणि अधिकार मंडळावरील नियुक्‍तीसाठी मोर्चबांधणी सुरू झाली आहे.
सर्वात प्रथम विद्यापीठ कायद्यानुसार प्रकुलगुरूंची नियुक्‍ती करणे बंधनकारक आहे. ही नियुक्‍ती कुलगुरूंच्या अधिकारातून होणार आहे. यानंतर अधिष्ठाताची नियुक्‍ती ही जाहिरात, मुलाखत या प्रक्रियेतून होईल. मात्र विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर नियुक्‍तीही कुलगुरूंना स्वत:च्या अधिकारातून करावयाची आहे. त्यामुळे या नियुक्‍त्या कशा पद्धतीने होतील, हाच प्रश्‍न आहे. त्याबाबत कुलगुरू करमळकर म्हणाले, विद्यापीठ कायद्यानुसार प्रकुलगुरूंची नियुक्‍ती होईल. मात्र ती गुणवत्तेच्या आधारावरच होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आतापासून प्रकुलगुरूपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.परगळ झटकून टाकावे लागेल
विद्यार्थी सुविधा केंद्राची दुरावस्था, वसतिगृहाची अपुरी संख्या, ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्राला होणारा विलंब असे काही विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने प्रश्न आहेत. परीक्षा विभागातील कामकाजाबाबत अनेक तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत विद्यापीठाला आलेली मरगळ झटकून टाकणे प्रमुख उद्दिष्ट राहील. विद्यापीठात विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबविण्यासाठी ई-रिक्षांचे प्रमाण वाढविण्यात येईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यापीठ परिसरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतले जाणार असल्याने कुलगुरूंनी नमूद केले.

संवादातून प्रश्‍नांवर मात
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्या मोठी आहे. त्यांच्या समस्यांही आहेत. विद्यार्थ्यांना कुलगुरूंची भेट घेण्यासाठी वेळ मागावी लागते. याकडे लक्ष वेधले असता करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. कुलगुरू विद्यार्थ्यांना भेटत नाही, असे यापुढे घडणार नाही. कुलगुरू विद्यार्थ्यांसाठी नेहमी असतील. तसेच महिन्यातील एक दिवस विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी राखीव ठेवण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची वेळही वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)