विद्यापीठात भव्य सभागृह व फूडमॉलचा प्रश्‍न मार्गी

पुणे – विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदानावरच भव्य सभागृह उभारण्यात येणार असून, तसा मंजुरीचा प्रस्ताव हेरिटेज विभागाकडून येणार आहे. त्यामुळे लवकरच येथील सभागृहाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवडीनुसार खाद्यपदार्थ मिळण्यासाठी फूडमॉलचे कामही येत्या दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे. ही दोन्ही कामे येत्या सात-आठ महिन्यांत पूर्ण होतील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

गेल्या 5 वर्षांत विद्यापीठात नव्याने बांधकाम झाली आहेत आणि काही प्रगतीपथावर सुरू आहेत. विद्यापीठातील जागा पाहता नवे कन्स्ट्रक्‍शन आता हाती घेतले जाणार नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. मात्र, पदवीप्रदान आणि वर्धापनदिनासाठी विद्यापीठाच्या पाठीमागील मैदानावर मांडव घालावा लागतो. त्यासाठी विद्यापीठाचे वर्षाला 80 लाख रुपये खर्च होतात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने याच मैदानावर 3 हजार आसनव्यवस्था असलेले सभागृह उभारण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदान हे हेरिटेजमध्ये आहे. त्यामुळे तेथे सभागृह बांधता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत हेरिटेज विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. येत्या 10 तारखेला होणाऱ्या बैठकीत हेरिटेजकडून सभागृहासाठी मान्यता मिळेल, असा विश्‍वास आहे. त्यानंतर लगेच तेथे भूमिपूजन केले जाणार आहे. येत्या सात-आठ महिन्यात हे सभागृह उभारण्याचा प्रयत्न केले जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले.

फूडमॉलची जागा बदलली
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून विद्यापीठात फूडमॉल मुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदानावर उभारण्याचे प्रस्तावित होते. आता त्या ठिकाणी भव्य सभागृहाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे फूडमॉल विधी विभागाच्या जवळ उभारण्यात येणार आहे. त्यात सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल असतील. त्या विषयावर येत्या 10 तारखेला बैठक आहे. त्यानंतर लगेच फूडमॉलचे भूमिपूजन केले जाईल. येत्या चार महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)