विद्यापीठात पुणेरी पगडीवरून पदवीप्रदान सोहळ्यात विद्यार्थ्यांचा गोंधळ

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११४ व्या पदवीप्रदान सोहळा आज रंगला. परंतु, सोहळ्यात पुणेरी पगडीवरून काही विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे विद्यापीठात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पदवीप्रदान सोहळ्या साठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरु डॉ. एन एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विविध विभागांचे विभागप्रमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठाने यंदा घोळदार गाऊन आणि टोपीऐवजी कुडता, पायजमा आणि उपरणे असा भारतीय पोशाख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पदवीप्रदान सोहळ्यातील मान्यवरांसाठी “पगडी’ही असणार आहे. परंतु या पोशाखात असणाऱ्या पुणेरी पगडीला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील पगडीच्या वादात न पडता विद्यापीठाने फक्त शिक्षण देण्याचे कार्य करण्याचा सल्ला देखील दिला होता. मात्र विद्यार्थी संघटनांचा विरोध डावलत व्यासपीठावरील मान्यवरांनी पुणेरी पगडी घातल्याचे दिसून आले. त्यामुळेच जनता दल युनायटेडचे सरचिटणीस कुलदीप आंबेकर, दयानंद शिंदे आणि शर्मिला येवले यांनी पुणेरी पगडीच्या निषेधाच्या घोषणा पदवीप्रदान सोहळ्यात दिल्या. त्यानंतर ताबडतोब सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेऊन चतुशृंगी पोलीस स्टेशनला रवानगी केली.

दरम्यान 1 लाख 3 हजार 124 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र तर 439 विद्यार्थ्यांना पीएच.डी प्रमाणपत्र पदवीप्रमाण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)