विद्यापीठात पाणीटंचाई आणखी महिन्याभर

टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतोय

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विद्यापीठाला आता टॅंकरच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहवे लागत आहे. आणखी महिनाभर हीच अवस्था कायम राहणार आहे.

पुण्यातील खडकवासल्याच्या कालवा फुटीपासून शहरात बऱ्याचशा भागातील पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठालाही पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागलेली आहे. यातून अद्याप विद्यापीठाची सुटका झालेली नाही. विद्यापीठात विविध विभाग आहेत. विद्यार्थ्यांचे वसतिगृह, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, अतिथीगृह या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते.

पाणी ही जीवनावश्‍यक बाब असल्याने त्याचा प्रत्येकाकडून वापर होणार हे स्पष्टच आहे. त्यातूनही सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन विद्यापीठाकडून अनेकदा करण्यात आलेले आहे. मात्र तरीही पाणी टंचाईची समस्या अद्यापही कायम असून त्याचा सर्वांनाच फटका बसू लागला आहे. आता पाण्याच्या नियोजनाचे गांभीर्य विद्यापीठाच्या लक्षात येऊ लागले आहे.

विद्यापीठाने पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी समितीही स्थापन केलेली आहे. पाणी किती येते व पाण्याचा किती प्रमाणात वापर होतो याची तपासणी करण्यात येणार आहे. पाईपलाईनमधून पाणी गळती होते का? याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले आहे. पाणीसाठ्याच्या टाक्‍यांची अवस्थाही तपासली जाईल. आवश्‍यक त्या सर्व दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाला टॅंकरच्या पाणीपुरवठ्याचा आधार घ्यावा लागतो आहे. महिन्याभरात पाणीप्रश्‍न सोडविण्यात येईल. त्यानंतर टॅंकरची संख्या आपोआपाच कमी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

विद्यापीठात 19 ते 23 डिसेंबर दरम्यान “युवास्पंदन’ आंतरविद्यापीठ पश्‍चिम विभाग युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या काळात विद्यापीठात मोठी गर्दी होणार असून या काळात गैरसाय होऊ नये म्हणून टॅंकरच्या पाणीपुरवठ्यात वाढ करावीच लागणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)