विद्यापीठात नागरी स्वच्छता, पाणीपुरवठाविषयक अभ्यासक्रम

पुणे, दि.8 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागरी स्वच्छता आणि पाणीपुरवठा विषयी अभ्यासक्रम सुरू होत आहे. देशात प्रथमच विद्यापीठ स्तरीय शिक्षणात अशा
प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, देशात आतापर्यंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नागरी स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन याविषयी अभ्यासक्रम उपलब्ध नव्हते. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. त्यासाठी विद्यापीठाने नेदरलॅंडची “आयएचई’ ही जगभरात पाणी विषयावर काम करणारी संस्था आणि पुण्यातील युनिटी कन्सल्टंट यांच्याशी सहकार्य करार केला आहे. हा अभ्यासक्रम 10 सप्टेंबर रोजी सुरू होईल. याविषयी सविस्तर माहिती विद्यापीठाच्या campus.unipune.ac.in संकेतस्थळावर डिपार्टमेंट आफ एन्वायर्न्मेंट स्टडीज या विभागामध्ये मिळू शकेल. या अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक पद्धतीने अध्यापन केले जाणार आहे. आयएचई संस्थेतील तज्ज्ञ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वेबिनार या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच, पुण्यातील युनिटी कन्सल्टंटच्या वतीनेही काही मान्यवर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमावर आधारित माहिती देण्यासाठी विद्यापीठाला सहाय्य करतील. पर्यावरणशास्त्र विभागातील प्राध्यापकही या अभ्यासक्रमासाठी अध्यापन करतील, अशी माहितीही डॉ. गोसावी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)