विद्यापीठात इन्क्‍युबेशन सेंटर कुठे आहे भाऊ?

 

पुणे, दि. 26 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन विद्यापीठ कायद्यानुसार “सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्‍युबेशन अँड लिंकेजेस’ स्थापन करण्यात आले असून, त्या अंतर्गत इन्क्‍युबेशन सेंटरच्या उपक्रमाचा थाटात सुरुवात झाली. मात्र विद्यापीठात हे इन्क्‍युबेशन सेंटर कुठे आहे? असाच प्रश्‍न नवसंशोधन विद्यार्थ्यापुढे पडला आहे. या सेंटरचे कार्यालय विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती नसल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाविन्यपूर्ण अशा निवडक कल्पनांना बळ देऊन त्यांचे व्यवसाय व उद्योगांमध्ये कसे रूपांतर करण्यासाठी या सेंटरतर्फे मदत केली जाणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नाविन्यपूर्ण संशोधनला चालना देण्यासाठी इन्क्‍युबेशन सेंटर सुरू करण्यात आले. मात्र त्याचे कार्यालय विद्यापीठाच्या कोणत्या भागात हेच माहिती नाही. या कार्यालयाची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, विद्यापीठात इन्क्‍युबेशन सेंटरच्या पोर्टलचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नुकतेच केले.

इन्क्‍युबेशन सेंटर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या आवारात कार्यरत आहे. या सेंटरच्या संचालिका म्हणून अपूर्वा पालकर कार्य पाहत आहेत. त्यांनी पोर्टलद्वारे अथवा ऑनलाईनद्वारे सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली. त्यासाठी स्वतंत्र लिंकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. मात्र कार्यालयाचा नेमका पत्ता कुठे आहे, हेच बहुतांश जणांना माहिती नसल्याची वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सेंटरचे कार्यालय या ठिकाणी आहे, त्याचे कोणतेच फलक विद्यापीठात निदर्शनास येत नाही.

दरम्यान, इन्क्‍युबेशन सेंटरचे कार्यालय आंतराष्ट्रीय केंद्राच्या वरच्या मजल्यावर आहे. मात्र हे सेंटर आयआयटी चेन्नईतील इन्क्‍युबेशन पार्कच्या धर्तीवर विद्यापीठातील “क्‍लासरुम कॉम्प्लेक्‍स’च्या जागी सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी मार्गदर्शन, व्याख्याने होणार आहेत. कार्यालय व सेंटरच्या ठिकाणावरून गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे नवे प्रकल्प घेऊन येणाऱ्या नवसंशोधकांपुढे मोठा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

Remarks :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)