विद्यापीठातर्फे “सेट’ परीक्षा 30 जूनला होणार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यात घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 30 जूनला होणार आहे. फेब्रुवारीमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, सेटसाठीही दोनच प्रश्नपत्रिका असतील. मात्र, ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे सेट विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नेट परीक्षेत बदल झाल्यामुळे सेटमध्येही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार सेटसाठी आता 350 गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिकांचे रुपांतर दोन प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली प्रश्नपत्रिका 100 गुणांसाठी, तर दुसरी प्रश्नपत्रिका 300 गुणांसाठी असेल. प्रश्नांच्या स्वरुपातही बदल करण्यात आले असून, पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी 60 ऐवजी 50 प्रश्न असतील, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 100 गुण असतील. प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परीक्षेचा अर्ज ऑनलाइनच भरावा लागणार आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज आधार कार्डला जोडण्यात आल्याने उमेदवारांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. निकालाच्या स्वरुपात बदल करण्यात आला असून, दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 6 टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील. त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान 40 टक्के (खुला प्रवर्ग) किंवा 35 टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.

पुढील सेट परीक्षा ऑनलाईन

जूनमध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. मात्र, त्यापुढील परीक्षा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्‍यक सोयीसुविधांचा आढावा घेतला जाईल. नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहे. त्याचप्रमाणे सेट परीक्षाही ऑनलाईनद्वारे घेण्याचा प्रयत्न सेट विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे यापुढील सेट परीक्षा ऑनलाईनद्वारे होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)