डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सहाजणांची समिती गठीत

पुणे – राज्यातील विद्यापीठांच्या मानांकनात दर्जा वाढ करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. विद्यापीठांचे मानांकन उंचावण्यासाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर व्यावसायिक संस्थेची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. व्यावसायिक संस्थेच्या मदतीतून विद्यापीठाच्या मानांकनात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या पाच महिन्यांपूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक झाली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही सर्व कुलगुरूंना विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी दिशा ठरविण्याचे निर्देश दिले होते. त्याच विषयावर पुन्हा दि. 6 ऑगस्ट रोजी बैठक झाली. त्यात विद्यापीठांना उच्च मानांकन प्राप्त करण्यासाठी व्यावसायिक संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील विद्यापीठांच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करून त्यामधील असलेल्या उणिवा दूर करून, त्यांच्या मानांकनात वाढ करण्यासाठी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. या संस्थेची निवड करण्यासाठी डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सहाजणांची समिती गठित करण्यात आली. ही समिती राज्यातील 13 विद्यापीठे व सुमारे 100 महाविद्यालयांसाठी संस्थेची निवड करणार आहे.

समितीचे सदस्य :
पुणे विद्यापीठ, कुलगुरू
मुंबई विद्यापीठ, कुलगुरू
शिवाजी विद्यापीठ, कुलगुरू
फर्गसन कॉलेज, प्राचार्य
उच्चशिक्षण, संचालक, पुणे
सहसंचालक, रूसा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)