विद्यापीठाच्या “इंडियन हिस्टरी कॉंग्रेस’वर राजकीय दबाव?

नियोजित कार्यक्रम रद्द : निधीची कमतरता असल्याचे कारण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डिसेंबर अखेर होणाऱ्या “इंडियन हिस्टरी कॉंग्रेस’ ही परिषद रद्द करण्याचा आश्‍चर्यकारक निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याचे कारण विद्यापीठाने दिले आहे. परिषदेसाठी एक-दीड कोटीचा खर्च विद्यापीठाला शक्‍य नाही, ही बाब हास्यापद आहे. राजकीय दबाव आल्याने विद्यापीठाने ही परिषद रद्द केल्याची माहिती पुढे येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाने 1935 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन करण्यात आलेली “इंडियन हिस्टरी कॉंग्रेस’ ही शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची परिषद तब्बल 55 वर्षांनंतर ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 28 ते 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार होती. ही परिषदच रद्द केल्याने विद्यापीठाच्या निर्णयावर इतिहासप्रेमींकडून टीका होत आहे.

या संदर्भात विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. राधिका सेशन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही परिषद रद्द करण्यात आल्याचे सांगितले. “निधीअभावी सध्या इंडियन हिस्ट्री कॉंग्रेसचे आयोजन करणे शक्‍य नाही. मात्र येत्या फेब्रुवारी- मार्च महिन्यापर्यंत निधीचे संकलन करून ही परिषद घेता येऊ शकेल,’ असेही सेशन म्हणाल्या. परिषदेसाठी येणाऱ्या अभ्यासकांची व्यवस्था बालेवाडीच्या गेस्ट हाऊसमध्ये केली जाणार होती. मात्र सध्या तिथे खेलो इंडियाच्या स्पर्धा सुरू असल्याने गेस्ट हाऊस उपलब्ध झाल्या नाहीत. अभ्यासकांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करणे खूप खर्चिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, “इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस’ परिषदेचा मान पुणे विद्यापीठाला मिळणे ही बाब इतिहास अभ्यासकांसाठी एक सुवर्णसंधी होती. मात्र, या परिषदेत मूळ इतिहासात फेरफार होण्याची शक्‍यता आहे. त्यावरून वाद उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन परिषद रद्द करण्यासाठी विद्यापीठावर राजकीय दबाव आल्याची चर्चा विद्यापीठात दबक्‍या आवाजात होत होती.

युवास्पंदनसाठी निधी, परिषदेसाठी नाही
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पश्‍चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे दि. 19 ते 23 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनामध्ये विद्यापीठाचे अधिकारी व्यस्त आहेत. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र त्याला निधीची कोणतीही अडचण नाही. त्याचवेळी इतिहासावर महत्त्वपूर्ण वैचारिक मंथन घडवून आणणाऱ्या इंडियन हिस्ट्री कॉंग्रेसच्या आयोजनासाठी निधीची कमतरता आहे, हे पूर्णपणे विसंगत आहे. त्यावरून या परिषदेवरून उलटसुलट चर्चा होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)