विद्यापीठाचे पुन्हा “समर्थ’ अभियान

यापूर्वी प्रतिसाद मिळत नसल्याचे गुंडाळण्याची आली होती नामुष्की

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यापूर्वीच “समर्थ भारत अभियान’ सुरू केले होते. त्यास काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हे अभियान गुंडाळण्याची नामुष्की विद्यापीठांवर आली. आता पुन्हा विद्यापीठातर्फे “समर्थ भारत अभियान’ राबविण्यात येणार असून, त्याचा मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि.11) शुभारंभ होणार आहे. त्यामुळे विद्यमान कुलगुरुंच्या नव्या समर्थ भारत अभियानास कसा प्रतिसाद मिळतो, हेच आता पाहावे लागेल.

तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी मोठा गाजावाजा करीत “समर्थ भारत अभियान’ राबविले. त्याचे मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यासह देशातही मोठे ब्रॅडिंगही केले. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास व सात्यतपणा राखण्यात विद्यापीठ व महाविद्यालये निष्प्रभ ठरले. त्यामुळे हे अभियान गुंडाळावे लागते. राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळाने समर्थ भारत अभियानातंर्गत अनेक उपक्रम राबविले. मात्र, प्रतिसादच नसल्याने हे अभियान नावापुरते राहिले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा हे अभियान सुरू होणार आहे, त्याची उत्सुकता विद्यार्थी व महाविद्यालयांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणास दि. 11 सप्टेंबर रोजी 125 वर्षे पूर्ण होत आहे. तसेच, त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते “समर्थ भारत अभियान’ उपक्रमाचा मंगळवारी (दि.11) शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी समर्थ भारत अभियानाची रूपरेषाही निश्‍चित केली जाणार आहे. दि. 11 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या दररम्यान मोठ्या प्रमाणात विद्यापीठ व महाविद्यालय संकुलात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हे समर्थ अभियान पूर्वीच्या अभियानाप्रमाणे राहणार की नाही, त्यात नव्या उपक्रमांचा समावेश असेल, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)