विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धा येत्या बुधवारी

तीन जिल्ह्यांमधील 170 संघांचा समावेश

पुणे – विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आविष्कार’ स्पर्धेची विद्यापीठ पातळीवरील फेरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या बुधवारी (दि. 2) होणार आहे. त्यात विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधील 170 संघ सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आविष्कार’ हा राजभवनचा उपक्रम आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण व्हावी आणि त्या प्रकारची संस्कृती वाढीस लागावी हा यामागाचा उद्देश आहे. या स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांत 9 ते 17 डिसेंबर या काळात घेण्यात आली. या स्पर्धेसाठी एकूण 2600 हून अधिक संघांनी त्यांच्या कल्पना (आयडिया) पाठवल्या होत्या. त्यातील प्रत्येक कल्पना त्या त्या विषयातील तीन तज्ज्ञांकडून पारदर्शी पद्धतीने तपासून घेण्यात आल्या. त्यातून 1100 संघांची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. जिल्हा पातळीवरील संघांमधून 170 संघांची निवड विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी केली गेली आहे. या स्पर्धेतून 48 संघांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 15 ते 17 जानेवारी 2019 या काळात गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात होणार आहे.

आविष्कार स्पर्धेत राज्यातील सर्व विद्यापीठे सहभागी होतात. या वर्षी तेरावी स्पर्धा पार पडत आहे. गेल्या 12 स्पर्धांपैकी 9 वेळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. आविष्कार स्पर्धा सहा विद्याशाखांमध्ये होते. त्यात मूलभूत विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मानवविज्ञान, भाषा व ललित कला, कृषी व पशुसंवर्धन, वैद्यक व औषधनिर्माण या विद्याशाखांचा समावेश आहे. ही स्पर्धा चार गटांमध्ये होते. पदवीपूर्व, पदव्युत्तर, एम. फील., पीएच. डी. करणारे विद्यार्थी आणि एम. फील., पीएच. डी. करणारे शिक्षक असे हे गट आहेत.

विद्यापीठातर्फे विशेष प्रयत्न
– विद्यापीठ पातळीसाठी पात्र ठरलेल्या संघांसाठी कार्यशाळा
– विद्यापीठ पातळीच्या स्पर्धेसाठी निवडले गेलेले संघांना प्रत्येकी एक हजार रुपये
– राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या सर्व संघांचा सर्व खर्च विद्यापीठ उचलणार
– आविष्कार संदर्भात पोर्टल तयार करणारे पहिलेच पुणे विद्यापीठ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)