विद्यापरिषदेच्या सदस्यपदी बारामतीचे डॉ. मुरुमकर

बारामती – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर राज्यपाल, महाराष्ट्र शासन व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी विद्यापरिषद सदस्यपदी नियुक्‍ती केली आहे. डॉ. चंद्रशेखर मुरुमकर हे गेल्या 31 वर्षांपासून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये अध्यापन करत आहेत. तर गेल्या नऊ वर्षापासून ते महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट “प्राचार्य पुरस्कार’ प्रदान केला आहे. वनस्पतीशास्त्र या विषयात त्यांचे 70 पेक्षा अधिक संशोधन लेख अनेक ख्यातनाम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहेत. “अकॅडेमी ऑफ प्लॅंट सायन्सेस’, इंडिया (एपीएसआय) या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय प्लॅंट सायंटीस्ट पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे अहमदाबाद येथे आयोजिलेल्या “सायंटीस्ट मिट 2015′ मध्ये त्यांना “फेलो ऑफ अकॅडमी ऑफ प्लॅन्ट सायन्सेस’ इंडीया या गौरवाने पुरस्कृत केले होते. डॉ. चंद्रशेखर मुरुमकर हे अनेक नामांकित संशोधन संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत. आजवर अनेक शाळा, महाविद्यालयांमधून वैज्ञानिक दृष्टीकोन व त्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी जवळपास 100 पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या नियुक्‍तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरहतदास शहा-सराफ, सचिव जवाहर मोतीलाल शाह -वाघोलीकर, संस्थेचे सर्व विश्‍वस्त, प्राध्यापक व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)