निगडी- येथील विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला. दीप प्रज्वलन मुख्यध्यपिका छाया हब्बू यांचे हस्ते करण्यात आले, तसेच सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रीती राणे यांनी हिंदी प्रार्थना मुलांकडून म्हणून घेतली व हिंदी राष्ट्रभाषेचे महत्व सांगितले. याच दिवशी हिंदी राष्ट्रभक्‍ती, भावगीत गाण्याची स्पर्धा झाली. 30 पेक्षा अधिक मुला-मुलींनी यात सहभाग घेतला. विविधतेत एकता या संकल्पनेवर आधारित नृत्याविष्काराचे नववीच्या मुलींनी सुदंर सादरीकरण केले. हर्ष काळभोर या छोट्या मुलाने स्वतः लेखन दिग्दर्शन करून छान नाटक सादर केले. सूत्रसंचालन प्रेरणा व्यास या विद्यार्थिनीने तर आभार देविका कुलकर्णीने व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रीती राणे, रुपाली ठोंबरे, दिपाली वानखेडे यांनी केले. संस्था अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, श्वेता भरत चव्हाण पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)