विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

शिरूर- येथील विद्याधाम प्रशालाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे आयोजित जिल्हा तसेच तालुकास्तरावरील विविध क्रीडा स्पर्धामध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शंकर शेळकेने प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुली तायक्वांदो स्पर्धा आरती चोरडियाने सुवर्णपदक, 14 वर्षाखालील मुले एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सृष्टी गायकवाडने सुवर्णपदक मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे आणि क्रीडाप्रमुख एस. टी. शेळके यांचे विद्याधाम प्रशाळेचे सचिव तु.म परदेशी, अध्यक्ष सुकुमार बोरा, उपाध्यक्ष उदकांत बाफना, मुख्याध्यापक डी. एन. खरमाटे, उपमुख्याध्यापक जी.टी. दळवी, पर्यवेक्षक के. एच. पटेल, बी. आर. काकडे आणि व्ही. जी. सुकळे यांनी अभिनंदन केले आहे.

तालुका पातळीवरील विजेते पुढीलप्रमाणे :
19 वर्षाखालील मुली 200 मीटर धावणे आणि तिहेरी उडीमध्ये विद्या साठे प्रथम क्रमांक, 100 मीटर धावणे, लांब उडीमध्ये हर्षदा ढवळे प्रथम क्रमांक, तिहेरी उडीमध्ये शिल्पा गायकवाड प्रथम क्रमांक, उंच उडीमध्ये ऋतुजा कोकाटे प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
19 वर्षाखालील विद्यार्थी गटात लांब उडीमध्ये अभिजीत मावळे प्रथम क्रमांक, गोळा फेकमध्ये सुहाना आतार प्रथम क्रमांक, प्राजक्ता ठोंबरे द्वितीय क्रमांक, थाळीफेकमध्ये अपेक्षा भोगावडे तृतीय क्रमांक, उंचउडी मध्ये आदित्य पाठक द्वितीय क्रमांक, 100 मीटर धावणेमध्ये प्राजक्ता बनकर तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
17 वर्षाखालील गटातील थाळीफेक, गोळाफेक आणि भालाफेकमध्ये सानिका खोडदे द्वितीय आणि तृतीय क्रमांक, किक बॉक्‍सिंगमध्ये आलिशा ढवळे प्रथम क्रमांक, तायक्वांदो स्पर्धेत आरती चोरडिया आणि आलिशा ढवळे प्रथम क्रमांक, भालाफेकमध्ये अभिषेक बडे द्वितीय क्रमांक, कराटेमध्ये सयुंक्त जंगम, कादंबरी गाडे, दिव्या कोळी आणि मंजुषा नहार द्वितीय क्रमांक, कुस्तीमध्ये मेघराज फंड, जीवन गाजरे द्वितीय क्रमांक, 100 मीटर धावणेमध्ये अजिंक्‍य कळमकर तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

-Ads-

कुस्ती 14 वर्षाखालील गटात कृष्णा येलभर, आनंद गाजरे, श्रेयस शेळके आणि साहिल शिंदे यांनी विविध वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविल्याने या चारही विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 14 वर्षाखालील थाळीफेकमध्ये ओंकार मोघे, अथर्व मुळे 100 मीटर धावणेमध्ये, आकांशा चौधरी तायक्वांदोमध्ये यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. याही विद्यार्थ्यांची जिल्हा पातळी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 14 वर्षां खालील गटात गोळाफेकमध्ये प्रांजल चव्हाण द्वितीय, उंच उडीत ओंकार मोघे द्वितीय, कराटे तनुजा दळवी द्वितीय, तन्वी घाडगे तृतीय, टायगर डॉ. नंदिनी गांधी द्वितीय साक्षी राजापूरकर, स्नेहल अडसुळे आणि मानसी वाळूज तृतीय, किकबॉक्‍सिंगमध्ये श्रेयस निश्‍चित, विश्वतेज कारंडे आणि जयराम थोरात द्वितीय तर शुभम बडे निखिल गाडे तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)