विदेशी बॉयफ्रेंडबरोबर नर्गिसचा ब्रेक अप

नर्गिस फाकरी “रॉकस्टार’मध्ये चमकली. तिचे सिनेमे आणि रोलबाबत बॉलीवूडमध्ये कोणाला विशेष उत्सुकता राहिलीच नाही. मात्र त्यानंतर तिच्या सिनेमांऐवजी तिच्याबाबतच्या ऑफस्क्रीन गॉसिपमुळेच तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. तिच्या लव्ह लाईफबाबत नेहमीच फिल्मी मासिके आणि वेबसाईटमध्ये खुसखुशीत चर्चा रंगत राहिली आहे.

आता तिच्या लव्ह लाईफबाबत एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. गेल्या काही काळापासून नर्गिस हॉलिवूडचा संगीतकार आणि डायरेक्‍टर मॅट अलांजोबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. हे दोघेही सोशल मिडीयावर आपले एकत्र फोटो सारखे शेअर करत असत. त्यांचे डेटिंग शेड्युल खूपच जोरात चाललेले असायचे. पण आतापर्यंत या दोघांनी आपल्या रिलेशनशीपबाबत काहीही स्वतःहून सांगितलेले नव्हते. मात्र आता या दोघांनी इन्स्टाग्रामवरचे एकमेकांचे फोटो डिलीट करायला सुरुवात केली आहे. यावरूनच लक्षात येते की नर्गिस आणि मॅटमधील “सो कॉल्ड रिलेशनशिप’ आता संपुष्टात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नर्गिस आणि मॅट गेल्या वर्षभरापासून लॉस एंजेलिसमध्ये लीव इन रिलेशनशीपमध्ये रहात होते. या काळात त्यांनी एकमेकांच्या नावांचे टॅटू देखील काढले होते. वर्षभरापूर्वी नर्गिस आणि उदय चोप्रामधील रिलेशनशीपही अशाचप्रकारे अचानक संपुष्टात आली होती. मॅटला किस केल्याच्या कारणावरून उदय चोप्राने तिला घराबाहेर काढले होते. त्यापूर्वी वर्षभर ती उदय चोप्राच्या घरामध्येच रहात होती. या नर्गिसला झाले आहे काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)