विदेशी प्रतिनिधींची आयआयआयडीईएम परिसराला भेट

नवी दिल्ली – भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेने आंतरराष्ट्रीय संस्था आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या विदेशी प्रतिनिधींसाठी दिल्लीत, द्वारका येथे विशेष भेट आयोजित केली होती. ऑस्ट्रेलिया, भूतान, गिनी, माल्डोवा, झांबियाच्या आंतरराष्ट्रीय आयडीईए आणि आयएफईएमच्या प्रतिनिधींनी या परिसराला भेट देऊन आयआयआयडीईएमच्या विविध सुविधांची पाहणी केली.

निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांनी आयआयआयडीईएमच्या नव्या परिसराची या प्रतिनिधींना माहिती दिली. या परिसरात 1000 लोकांना 12 तुकड्यांत एकाच वेळी प्रशिक्षण देण्याची संस्थेची क्षमता असल्याचे जैन यांनी सांगितले. या परिसरात 450 आसनक्षमता असलेले सभागृह आणि 100 खोल्यांचे वसतीगृह आहे. संस्थेचा दृष्टीकोन, उद्दीष्ट आणि संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्याबरोबरच या प्रतिनिधींनी आणि निवडणूक व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी क्षमता वृद्धी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)