विदेशी पोस्ट ऑफिसमधून लवकरच ई व्यापार 

नवी दिल्ली – ई व्यापार क्षेत्रातून निर्यात करणे सहजसोपे जावे यासारठी अबकारी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ई व्यापार कंपन्यांना इंडिया पोस्ट आणि अन्य विदेशी टपाल कार्यालयांच्या माध्यमातून डिलीव्हरी करण्यासाठी विभागाकडून प्रस्ताव मांडण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. 2016 पासून मुंबई, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणाहून एमईआयएस उपक्रमांतर्गत विदेशी टपाल कार्यालयातून ई व्यापार निर्यात करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये सुधारणा करत सर्व विदेशी टपाल कार्यालयांच्या माध्यमातून निर्यात करण्यात येणार आहे.

टपालच्या माध्यमातून आयात आणि निर्यात करण्यात येत असल्याने यामध्ये वृद्धी होण्यासाठी अबकारी विभाग आणि डिरक्‍टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड गेल्या वर्षभरापासून संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून निर्यात करण्यासाठी अबकारी विभागाकडून सुलभ प्रणाली राबविण्यात येत आहे. व्यावसायिक मालपुरवठा करणाऱया कंपन्यांची कमतरता भासत असल्याने ही गरज भरून काढण्याचे काम टपाल विभागाकडून करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)