विदेशी कंपन्यांच्या गुलामगिरीत भारत

रामदेव बाबा- कराडमध्ये तीन दिवसीय योग शिबिर

कराड – अतुल भोसले युवा प्रतिष्ठानतर्फे कराड येख “तीन दिवसीय योग शिबिरा’ची सुरुवात शनिवारी (दि. 14) छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झाली. शिबिराचे उद्‌घाटन डॉ.अतुल भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक व शहरातील प्रशासकीय अधिकारी, हजारो नागरिक उपस्थित होते.

-Ads-

पत्रकारांशी संवाद साधताना रामदेवबाबा म्हणाले की, भारत देश विदेशी कंपनी ईस्ट इंडियाकडून झालेली लूट अजूनही विसरू शकला नाही. आजही 5000 हून अधिक विदेशी कंपन्या देशातील 50 लाख करोड रुपयांच्या अर्थव्यवस्थेवर ताबा ठेवून आहेत. देश अजूनही कृषी, शैक्षणिक, उपचार पद्धत्ती यासारख्या क्षेत्राबाबतीत विदेशी कंपन्यांच्या गुलामगिरीत आहे. स्वावलंबी, गौरवशाली देशाला हे हानिकारक आहे. पतंजलीमुळे देशातील आर्थिक व्यवहार देशातच राहतो. इतर विदेशी कंपन्यांच्या तुलनेत पतंजलीच्या उत्पादित वस्तू 25 ते 100 टक्के तर, औषधी वस्तू 400 टक्केने स्वस्त असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. आजपर्यंत 5000 शिबिर व 20 लाख किलोमीटर चा प्रवास केला. त्यापैकी सर्वात जास्त यशस्वी शिबिर कराडचे असल्याचे योग गुरू रामदेव बाबा यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल विचारता, अण्णा हजारे हे मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशी उपमा देत व्यक्तिगत माणूस म्हणून खूप चांगली व्यक्ती आहे, अशी टिप्पणी दिली. अण्णा हजारे यांना आंदोलनसाठी आम्ही उभे केले. त्यांना कृषी गौरव पुरस्कार ही देण्यात आला. आंदोलन देशहितासाठी केले. परंतू त्याचा उपयोग राजकीय हेतूने होवू लागल्याने त्याचा विचार अण्णा हजारे करीत आहेत.

मी कोणत्याही पक्षाशी संलग्नित नाही. मी नि:पक्षीय आहे, याचे उदाहरण देताना योग गुरू रामदेव बाबा यांनी बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. कराडमधील योग शिबिर हे कोणत्याही राजकीय दृष्टीने आयोजित नसल्याचे रामदेव बाबा म्हणाले. रविवारी (दि. 15) मेडिकलच्या विद्यार्थी मेळावा व महिला मेळाव्याचे आयोजन आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)