विदर्भात थंडीची लाट कायम; गोंदिया 8 अंशांवर

पुणे – गेले काही दिवसांपासून राज्यात असणारी थंडीची लाट किंचित ओसरण्याची शक्‍यता आहे. राज्यात विदर्भ वगळता सर्वच भागात किमान तापमानात वाढ होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सोमवारीसुद्धा राज्यात सर्वात कमी तापमान हे गोंदिया जिल्ह्यात 8 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आहे. दोन दिवसांपूर्वी तर तापमान हे 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या शीत लहरीमुळे ही राज्यात थंडीची लाट आली होती. पण सोमवारपासून किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. आज राज्यात विदर्भ वगळता राज्यातील अनेक भागातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.

-Ads-

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार आहे. त्याचबरोबर विदर्भ वगळता इतर भागात किमान तापमानात सरासरीच्या किंचित घट होईल. पुणे शहरातही सोमवारी तापमान हे 11.5 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. आगामी दोन दिवसांत शहरात तापमानाचा पारा किंचित वाढ होऊन 12 ते 13 अंशापर्यंत पोहचण्याची शक्‍यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचे प्रमाण वाढले, तर मात्र राज्यात पुन्हा थंडी पडण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)